gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कॉमर्स विभागातील विद्यार्थ्यांची ‘कॅम्पस ड्राईव्ह’मध्ये निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलतर्फे आयोजित स्कॉलर कट्टा सोल्युशन्स प्रा. लि. या पुणे येथील कंपनीकरिता ‘सेल्स अॅड मार्केटिंग एक्सिक्यूटीव्ह’ या पदाकरिता शनिवार दि. ५ मार्च २०२२ रोजी झालेल्या इंटरव्ह्यूकरिता २५ पेक्षा जास्त विद्यार्थी विविध शाखांमधून उपस्थित होते. यामधून कॉमर्स विभागातील सुश्मिता कापुरे व अझरा काझी या दोन विद्यार्थिनींची कंपनीतर्फे निवड करण्यात आली.

यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांचे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.