gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बॉश ब्रिज कोर्सच्या विद्यर्थीनींकडून ‘महिला दिन’ साजरा

gjc-bosch-womens-day-news

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल तसेच ध्येय अॅकॅडमी, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने बॉश इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या सी.एस.आर. उपक्रमाचा एक भाग म्हणून कंपनी पुरस्कृत ‘ब्रीज’ हा इम्प्लायबिलिटी स्किल्सचा कोर्स महाविद्यालयात सुरु आहे.

या कोर्सच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनिंनी दि. ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एका आगळ्यावेगळ्या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच स्त्री प्राध्यापिका आणि इतर स्त्री कर्मचारी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत पेन आणि पॉकेट डायरीचे ५०० जणींना वाटप केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी तसेच महाविद्यातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी यांनी कौतुक केले. महाविद्यालयात सर्वत्र या उपक्रमाची चर्चा सुरु होती.

Comments are closed.