gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे ‘खगोलशास्त्र कार्यशाळेचे’ आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे खगोलशास्त्र विषयातील कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळा महाविद्यालयात दि. २६ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत रोज संध्याकाळी ४.३० ते रात्री ९.०० या वेळेत असेल.

खगोलविश्वाच्या रंजक गोष्टी उलगडून दाखविणाऱ्या या कार्यशाळेत ग्रह तारकांची माहिती, सौर दिनदर्शिका, पंचांगाचा आकाश निरीक्षणासाठी वापर, उघड्या डोळ्यांनी आकाश निरीक्षण, दुर्बिणीद्वारे आकाश दर्शन इ. विषयांचा अंतर्भाव असेल.

कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी खगोलशास्त्र विषयातील अनुभवी तज्ज्ञ श्री. हेमंत मोने, आकाश मित्रमंडळ, कल्याण; प्रा. पद्मनाभ सरपोतदार, गुहागर उपलब्ध असतील. या कार्यशाळेत खगोलशास्त्राची आवड असणाऱ्या वा कुतूहल असणाऱ्या व्यक्ती सहभागी सहभागी होऊ शकतात. सदर कार्यशाळेसाठी रु. ३०० प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.

कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी डॉ. विवेक भिडे (9421139296); प्रा. बाबासाहेब सुतार (7738458185); प्रा. निशा केळकर (9405072376) खगोल अभ्यासकेंद्र, भौतिकशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा. कार्यशाळेसाठी नाव नोंदणी दि. १९ मार्च २०२२ पर्यंत करता येईल. या कार्यशाळेसाठी मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करावी.

अधिकाधिक खगोलप्रेमींनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.