gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १५ मार्च रोजी इंटरव्ह्यू

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स- प्लेसमेंट सेल आणि मुंबईस्थित एन.आय.आय.टी. यांच्या संयुक्त विद्यमाने आय.सी.आय.सी.आय. आणि अॅक्सिस बँकेतील निवडक जागा भरण्याकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १५ मार्च २०२२ रोजी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखतीला महाविद्यालयातून शैक्षणिक वर्ष २०१९-२०, २०२०-२१ यावर्षी पदवी परीक्षा कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण झालेले तसेच २०२१-२२ या वर्षात पदवीच्या अंतिम परीक्षेला बसणारे विद्यार्थी उपस्थित राहू शकतात.

यासाठीची प्रक्रिया सकाळी ११.०० वाजता डॉ. केळकर सेमिनार हॉल, मुख्य इमारत येथे सुरु होईल. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी येताना मूळ प्रमाणपत्रे, फोटो, बायोडेटा इ. कागदपत्रे सोबत घेऊन यावीत असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक डॉ. रुपेश सावंत ९४२११४२५२९ यांचेशी संपर्क साधावा असे कळविण्यात येत आहे.

Comments are closed.