gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आपत्ती व्यस्थापन कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी जिल्हा नागरी संरक्षण विभाग आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा महाविद्यालयात नुकतीच संपन्न झाली. आपत्तीपूर्व व्यवस्थापन कसे करावे, तसेच आपत्तीनंतरचे व्यवस्थापन आणि उपाययोजना, आपत्ती उद्भऊ नये म्हणून घेण्याची खबरदारी या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने दि. २० जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा नागरी संरक्षण विभाग आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेसाठी साधनव्यक्ती म्हणून रत्नागिरी जिल्हा नागरी संरक्षण विभागाचे सहाय्यक उप-नियंत्रक श्री. सु. सी. मदगे आणि श्री. एम. के. म्हात्रे यांनी काम पाहिले. श्री. सु. सी. मदगे यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून आपत्तीची संकल्पना, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती, त्याचे प्रकार इ. विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच नागरी संरक्षण विभाग पुरवीत असलेल्या सेवांवर प्रकाश टाकला.

सहाय्यक उपनियंत्रक श्री. एम. के. म्हात्रे यांनी नागरी संरक्षण विभागाची रचना, कार्यपध्दती, विभाग करत असलेले विविध कार्य, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही कार्यशाळा उत्तमरित्या पार पाडली.

Comments are closed.