gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता पूल कॅम्पस ड्राईव्ह

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल व मुंबईस्थित आय.टी.एम. स्किल्स अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आय.सी.आय.सी.आय. बँकेतील ‘रिलेशनशिप मॅनेजर’ या पदांकरिता मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती कोणत्याही शाखेतील पदवीधर देऊ शकतात. यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनासुद्धा ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तरी बँकिंग क्षेत्रात आपले करिअर करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला बोयोडेटा व मूळ कागदपत्रांसह शुक्रवार दि. २९ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल, मुख्य इमारत येथे उपस्थित राहावे. याविषयी अधिक माहितीकरिता समन्वयक डॉ. रुपेश सावंत (मोबा. ९४२११४२५२९) यांचेशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.