gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचा अभिनव उपक्रम पोस्टर व मॉडेल प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी केला अर्थशास्त्रीय संवाद

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचा अभिनव उपक्रम पोस्टर व मॉडेल प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी केला अर्थशास्त्रीयसंवाद

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाने अर्थशास्त्र विषय जनसामान्यांपर्यंत सुलभः पद्धतीने पोहचण्यासाठी अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. या अर्थशास्त्रीय पोस्टर व मॉडेल प्रदर्शनाचे उद्घाटन कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले.

पैसा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो मात्र पैशाविषयी मार्गदर्शन करणारे अर्थशास्त्र मात्र प्रत्येकाला समजतेच असे नाही. हीच स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी एज्यूकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे अर्थशास्त्र विषयाचे पोस्टर व मॉडेल प्रदर्शन सोमवार दि. २०/०२/२०२३ रोजी आयोजित करण्यात आले. अर्थशास्त्र हा विषय काही जणांना अवघड वाटतो किंवा त्यातील संकल्पना क्लिष्ट वाटतात. परंतु अर्थशास्त्र विषयांतर्गत सादर केलेल्या या प्रदर्शनातून तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर व मॉडेल्सद्वारे अर्थशास्त्र हा विषय समजण्यास सुलभ केला. शाश्वत विकास, बदलती चलन पद्धती, सेवांचा व्यापार, विनिमय दर स्मार्ट सिटी बेरोजगारी, उत्पादन पद्धती, कृषी पर्यटन, व्यापारचक्र, शहरी आर्थिक विकास, ग्रामीण आर्थिक विकास यांचे मॉडेल मॉडेल उभारण्यात आले होते. हे अभिनव प्रदर्शन पाहण्याचा लाभ महाविद्यालयातील तसेच इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला. प्रदर्शन सादरीकरणात सहभागी विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र विषयक अनेक संकल्पनांचे सोप्या भाषेत विवेचन केले. पोस्टर, मॉडेल, तक्ते, रांगोळी, चित्रे व आकृत्या या माध्यमातून आपली सदरीकरण कौशल्ये अधिक विकसित केली.

महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अर्धशास्त्र विषय अधिकाधिक जनसामान्यांच्या कल्याणाकरिता कसा वापरता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे तसेच अर्थशास्त्रातील क्लिष्ट संकल्पना सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत मांडल्यास ते अधिक उपयुक्त होईल तसेच  विद्यार्थांचा प्रदर्शनातील सहभाग व विविध मॉडेल सादरीकरणाचा आत्मविश्वास त्यांच्या भावी जीवनात उपयोगी ठरेल असे सांगितले.

उपक्रमातील सर्व विद्यार्थी, विभाग प्रमुख डॉ. रामा सरतापे, सहकारी प्राध्यापक डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. सुर्यकांत माने यांच्या या सहकार्यातून संपन्न झालेल्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया फलकावर नोंदविल्या. अर्थशास्त्र विभागातर्फे प्रदर्शित झालेल्या या प्रदर्शनाला विद्यार्थ्याचा तसेच महाविद्यालयीन शिक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अर्थशास्त्रीयसंवाद अर्थशास्त्रीयसंवाद अर्थशास्त्रीयसंवाद
Comments are closed.