gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘जॉब फेअर-२०२३’

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल; ध्येय अ‍ॅकॅडमी ऑफ स्कील डेव्हलपमेंट आणि आर.पीज्. अ‍ॅकॅडमी या रत्नागिरीस्थित संस्था यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘जॉब फेअर-२०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, पुणे आणि रत्नागिरी येथील विविध क्षेत्रातील १४ कंपन्यांचा समावेश आहे.

सदर जॉब फेअरकरिता उपस्थित राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसाहित सकाळी १०.०० वाजता राधाबाई शेट्ये हॉल, मुख्य इमारत, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे उपस्थित राहावे; असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत, मोबा. ९४२११४२५२९ यांचेशी संपर्क साधावा असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी कळविले आहे.

GJC Job Fair 2023

Comments are closed.