gogate-college-autonomous-logo

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात अभिरूप युवा विधानसभा संपन्न

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात अभिरूप युवा विधानसभा संपन्न

राजकारणात सर्वच वाईट नसतात. काही असेही असतात जे पोटतिडकीने जनतेचे प्रश्न मांडत असतात. त्यामुळे  युवकांनी राजकारणात येणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सतीश शेवडे यांनी  केले. ते गोगटे जोगळेकर महाविद्यालय आयोजित अभिरूप युवा विधानसभा कार्यक्रमात बोलत होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताईं पटवर्धन यांच्या संकल्पनेतून अभिरूप युवा विधानसभा उपक्रम  गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि.२० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता राधाबाई शेटये सभागृहात संपन्न झाला.  या कार्यक्रमात महाविद्यालयातील काही विद्यार्थी सत्ता पक्ष तर काही विद्यार्थी विरोधी पक्षनेते व सदस्य पदी विराजमान झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पी. पी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अभिरूप युवा विधानसभेच्या निमित्ताने विद्यार्थीदशेपासूनचयाअभिरूप युवा विधानसभेच्या माध्यमातून राजकारणात सकारात्मकपणे काम करू शकतो, असा विश्वास त्यांच्यात निर्माण होईल.   विद्यार्थ्यांना स्वाभाविकच  प्रश्न कसे विचारावेत? उत्तर कोणत्या पद्धतीने द्यावीत? विधानसभा व तिचे कामकाज कसे चालते याची  माहिती होणार आहे. त्यामुळे हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात नमूद केले.

अभिरूप युवा विधानसभा कार्यक्रमात सुरुवातीला वंदे मातरम् होऊन सभापतींच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणे , शोकप्रस्ताव आणि यानंतर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून कोकणातील पाणवठे व त्यांची स्वच्छता, कोकणातील प्रकल्प व त्यांचे परिणाम, जिल्हा रुग्णालयातील सुविधा, मुंबई-गोवा महामार्ग व त्या संदर्भातील प्रश्न , कोकणातील पर्यटन तसेच शिक्षण, आरोग्य, उद्योग यासारख्या विषयांवर विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारण्यात आले. सत्ताधारी पक्षाने देखील त्याला समर्पक उत्तरे दिली. राष्ट्रगीत होऊन विधानसभा  अधिवेशनाची सांगता झाली.

अभिरूप युवा विधानसभा कार्यक्रमात मुलांचा कृतिशील सहभाग  वाखाणण्याजोगा होता. त्यासाठी प्रा. निलेश पाटील, प्रा. सचिन सनगरे, डॉ.दिनेश माश्रणकर, प्रा. जयंत अभ्यंकर, डॉ. अजिंक्य पिलणकर, प्रा. सीमा वीर, प्रा. पंकज घाटे, प्रा, ऋजुता गोडबोले, प्रा. मोहिनी बामणे, प्रा. कृष्णात खांडेकर, प्रा. शुभम पांचाळ यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला विधी महाविद्यालयाच्या  प्रा. संयोगिता  सासने, विद्यार्थी तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञानशाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. आनंद आंबेकर, विद्यार्थी व  प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश पाटील यांनी केले तर  कला शाखा उपप्राचार्या आणि या कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. चित्रा गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले तसेच उपस्थित सर्वांचे आभार  मानले . असे स्तुत्य कार्यक्रम यापुढे  नक्की राबवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात अभिरूप युवा विधानसभा संपन्न
Comments are closed.