gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील ‘बॉश’ ब्रीज कोर्सच्या विद्यार्थ्यांना प्रमाणप्रत्रांचे वितरण

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील ‘बॉश’ ब्रीज कोर्सच्या विद्यार्थ्यांना प्रमाणप्रत्रांचे वितरण

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल आणि ध्येय अ‍ॅकॅडमी, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात बॉश अ‍ॅकॅडमी, रत्नागिरी आणि ध्येय अ‍ॅकॅडमी, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बॉश इंडिया लि. या भारतातील प्रथितयश कंपनीने तयार केलेला ‘ब्रीज’ हा कोर्स चालविला जातो. विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स तसेच एम्प्लॉयबिलिटी स्किल्स वितरीत करणे, त्यांना प्रशिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे या उद्देशांनी सदर कोर्स चालविला जातो. आतापर्यंत तीन बॅचेस पूर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांनी विविध आस्थापनांमधील प्रशिक्षण पूर्ण करून त्यानंतर नोकऱ्या सुद्धा मिळवल्या आहेत.

नुकताच तिसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरीत करण्याचा समारंभ संपन्न झाला. सदर कार्यक्रमप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. यावेळी प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत, श्रीम. पूजा कदम, श्री. राधेय पंडित उपस्थित होते.

या कोर्सची चौथी बॅच सुरु होत असून नवीन विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रमाणपत्र प्राप्त तिसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नवीन सुरु होणाऱ्या बॅचमधील प्रवेशासाठी डॉ. रुपेश सावंत, मोबा. ९४२११४२५२९ आणि श्रीम. पूजा कदम, मोबा. ८९९९८०७६१२ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.