gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाची कौतुकास्पद कामगिरी तीन विद्यार्थी राज्य पात्रता परीक्षेत उत्तीर्ण

गोगटे जोगळेकर महाविद्यातील समाजशास्त्र विभागातील माजी विद्यार्थी अभय तेली, राधेय पंडित व कविता जाधव यांनी समाजशास्त्र विषयासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. महाविद्यालय व समाजशास्त्र विभागाच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

महाविद्यालयात २००४ साली पदव्यूत्तर स्तरावर समाजशास्त्र विषयाची सुरुवात करण्यात आली. माजी विभागप्रमुख कै. संजय जोशी यांचे विभाग सुरु करण्यात महत्वपूर्ण योगदान होते. यापूर्वी ०४ विद्यार्थांनी राज्य पात्रता परीक्षेत यश मिळविले होते. नुकत्याच घोषित झालेल्या परीक्षेच्या निकालात विभागाच्या ०३ विद्यार्थांनी यश प्राप्त केले. हे सुयश महाविद्यालयास निश्चितच गौरवास्पद आहे असे मत मार्गदर्शक आणि विभागप्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे यांनी व्यक्त केले.

समाजशास्त्र विभागाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, कला शाखा उपप्राचार्या व पदव्यूत्तर विभागप्रमुख डॉ. चित्रा गोस्वामी तसेच प्राध्यापक सहकाऱ्यांकडून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.

कविता जाधव अभय तेली राधेय पंडित
कविता जाधव अभय तेली राधेय पंडित
Comments are closed.