gogate-college-autonomous-logo

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला योगा स्पर्धा मुंबई विद्यापीठ महिला योगा संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. सृष्टी मनोज जाधव व कु.अवंती अविनाश काळे या विद्यार्थिनींची निवड

कु. अवंती अविनाश काळे (F.Y.BSc) कु. सृष्टी मनोज जाधव ( T.Y.BSC)

दि. 25 ते 28 डिसेंबर 2021 रोजी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी विद्यापीठ, भुवनेश्वर, ओडिसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला योगा स्पर्धेकरीता मुंबई विद्यापीठ महिला योगा संघामध्ये आपल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कु. अवंती अविनाश काळे (प्रथम वर्ष विज्ञान) व कु. सृष्टी मनोज जाधव (तृतीय वर्ष विज्ञान) या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे.

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला योगा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कु. सृष्टी मनोज जाधव व कु. अवंती अविनाश काळे या विद्यार्थिनींचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, क्रीडासंचालक डॉ. विनोद शिंदे, जिमखाना समितीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तिनही विभागाचे उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Comments are closed.