gogate-college-autonomous-logo

२ महाराष्ट्र नेव्हल युनिट, रत्नागिरीची ‘कोकण कोविड वॉरिअर सागरी नौका मोहीम’ काळबादेवी येथे संपन्न

२ महाराष्ट्र नेव्हल युनिट, रत्नागिरीची ‘कोकण कोविड वॉरिअर सागरी नौका मोहीम’ काळबादेवी येथे संपन्न

२ महाराष्ट्र नेव्हल एन.सी.सी. युनिट, रत्नागिरीची कोकण कोविड वॉरिअर सागरी नौका मोहीम नुकतीच काळबादेवी येथे संपन्न झाली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी या मोहिमेचे शानदार स्वागत केले. काळबादेवी येथील पीर दर्गा येथे या सागरी नौका मोहिमेत सहभागी असलेले २ महाराष्ट्र नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर लेफ्ट. कमांडर एम. एम, सईद यांच्या नेतृत्वाखाली सर्व स्टाफ आणि एन.सी.सी.चे विद्यार्थी यांचे बसणी प्रशालेचे विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, सर्व आबालवृद्ध ग्रामस्थ यांनी जोरदार स्वागत केले. उत्स्फूर्त घोषणा देत सहभागी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.

येथून ही मोहीम काळबादेवीचे ग्रामदैवत श्री. देव रामेश्वर आणि देवी कालिका मंदिरात दाखल झाली. देवी कालिका मंदिरात संगणकिय पीपीटीच्या माध्यमातून श्री. बापू गवाणकर यांनी काळबादेवी गावाचा भौगोलिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि पर्यटनदृष्ट्या आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेतला. त्यानंतर मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था सौ. नंदिनी शेट्ये यांच्या साईराज सहाय्यता महिला बचत गटाने केली. कोकण कोविड वॉरिअर सागरी नौका जनजागृती मोहिमेच्या आयोजनात श्री. प्रसाद तथा बापू गवाणकर, एस.एम.आय. श्री. जाधव,श्री. प्रकाश शेट्ये, श्री. सुनील मयेकर, श्री. गजाभाई जोशी, श्री. समीर शेट्ये, श्री. भोसले साहेब, श्री. अशोक बिर्जे,सौ. प्राची मयेकर, श्री. संजय वारेकर, श्री. मुकेश शेट्ये यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

कोकण कोविड वॉरिअर

Comments are closed.