gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता यशस्वी निवड

महाविद्यालयाच्या करियर गायडन्स अॅड प्लेसमेंट सेल आणि एन.आय.आय.टी., मुंबई यी संयुक्तपणे आयोजित ऑक्टोबर २०२१ मध्ये घेतलेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विविध शाखांमधील आठ विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड आय.सी.आय.सी.आय. बँकेककरिता ऑफिसर पदाकरिता निवडले गेले आहेत. यामध्ये मयुरी पांचाळ, आफिझ झारी, साकलीन कुरेशी, गौरी नागवेकर, पूजा मेस्त्री, ऋतुजा गोळपकर, स्नेहल मयेकर आणि सागरिका महाडिक यांचा समावेश आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे. मागील पाच-सहा वर्षांच्या कालावधित आतापर्यंत महाविद्यालयातील ६० पेक्षा जास्त विद्यार्थी आय.सी.आय.सी.आय. बँकेत ऑफिसर या पदावर रुजू झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये करियर गायडन्स अॅड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे; याचा आवर्जुन उल्लेख प्राचार्यांनी केला आणि विभागाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Comments are closed.