gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संशोधन विभागातर्फे कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांसाठी संशोधन विभागातर्फे ‘प्लाजेरिजम कार्यशाळा’ नुकतीच आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांचे विविध प्रकल्प तसेच संशोधन कार्य प्लाजेरिजम सॉफ्टवेअर मधून पडताळूनच सादर करावे लागते. यामुळे वाङ्मयचौर्य टाळता येते आणि संभाव्य चुका टाळता येतात. याबाबतची सविस्तर माहिती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील सायंटीफिक ऑफिसर डॉ. ज्योतिप्रकाश यादव यांनी दिली.

महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ही व्याख्याने आय.सी.टी.च्या माध्यमातून खूप उद्बोधक झाली. यानंतर वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे आणि विज्ञान शाखेचे उपप्राचार्य विवेक भिडे यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली.

डॉ. मिलिंद गोरे, डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, डॉ. उमेश संकपाळ, डॉ. स्वामिनाथन भट्टार, प्रा. बी. सी. भिंगारदिवे, प्रा. सुहास नागले यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रा. अश्विनी देवस्थळी आणि प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी सुत्रसंचालन केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Comments are closed.