gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील प्राध्यापकांची सारस्वत महाविद्यालय, गोवा भेट

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील प्राध्यापकांची सारस्वत महाविद्यालय, गोवा भेट

गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आणि सारस्वत महाविद्यालय, म्हापसा, गोवा यांच्यात शैक्षणिक देवाण-घेवाणीकरिता सामंजस्य करार झालेला आहे. याअंतर्गत दोन्ही महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नियमित भेटी व शैक्षणिक बाबींवर आदानप्रदान चालू असते. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील डॉ. रुपेश सावंत आणि प्रा. स्वरूप घैसास यांनी तेथील प्राध्यापकांशी शैक्षणिक विचारविनिमय करण्याबरोबरच डॉ. सावंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्रातील संशोधन’ या विषयावर मार्गदर्शन केले.

पुढील काळातही अशीच फलदायी देवाण-घेवाण सुरु राहिल असा आशावाद व्यक्त करताना दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि डॉ. संतोष पाटकर यांनी विशेष शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.