gogate-college

गोवा येथील नॅशनल सेमिनारमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक

गोवा येथील नॅशनल सेमिनारमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक

फादर अॅग्नेल कॉलेज ऑफ आर्ट्स अॅड कॉमर्स, पिलार, गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य, बी.एम.एस. आणि अकौंटिंग अॅड फायनान्स या विभागातील ओंकार भागवत, अनाहिता साळवी, नील जैन, दर्शन जैन, हर्षल सावंत, मोहिनी सुर्वे आणि यामिनी रेडीज या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले शोधनिबंध सादर केले. यातील ‘इंफ्लूएन्स ऑफ ई-कॉमर्स वेबसाईट ऑन सोसायटी अॅड रिटेल सेक्टर-अ स्टडी ऑफ रत्नागिरी सिटी’ या ओंकार भागवत व अनाहिता साळवी यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाला द्वितीय क्रमांकाचे रु. ३००० चे पारितोषिक व प्रमाणपत्र प्राप्त झाले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रा. स्वरूप घैसास, डॉ. रुपेश सावंत यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विभागप्रमुख प्रा. बी. सी. भिंगारदिवे यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.