gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे ‘स्टेट लेव्हल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ स्पर्धा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘टापिक्स इन मॅथॅमॅटिक्स’ या स्टेट लेव्हल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या स्पर्धेच्या युगात सादरीकरणाला खुप महत्व आहे. हे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयाच्या गणित विभागाने सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत सांगली, कोल्हापूर, गोवा आणि रत्नागिरीतील येथील विविध महाविद्यालयांतील २५ स्पर्धक १३ गटांतून सहभागी झाले होते.

फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरीचे डॉ. एस. बी. कुलकर्णी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील गणित विभागाचे माजी प्रमुख डॉ. राजीव सप्रे तसेच आय.टी. विभागातील प्रा. अदिती जोशी यांनी सदर स्पर्धेचे परिक्षण केले.

स्पर्धकांनी सादरीकरणातून मांडलेले विविध प्रकारचे गणितातील विषय, परिक्षकांनी त्यांना विचारलेले प्रश्न, त्यावर स्पर्धकांनी दिलेले उत्तरे अशा उत्साही आणि आनंदी वातावरणात ही स्पर्धा संपन्न झाली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सर्व स्पर्धकांचे स्वागत केले आणि स्पर्धेला आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. विज्ञान शाखेचे डॉ. विवेक भिडे यांनीही याप्रसंगी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रमिका नाईक आणि गॉडसन रॉड्रिग्ज, धेंम्पे महाविद्यालय; द्वितीय क्रमांक विनय मोरे गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी; तृतीय क्रमांक मयुरी निर्मळेकर आणि सुरेश कुंडंगी, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली यांनी पटकावले. परितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र आणि परितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ऋतुजा ओक आणि कु. मृणाल पुरोहित यांनी केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आणि गणित विभागप्रमुख प्रा. दिवाकर करवंजे यांच्या विशेष प्रयत्नांतून सदर स्पर्धा संपन्न झाली.

 

 

 

Comments are closed.