gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना शेअर ट्रेडिंग आणि इतर सेवा क्षेत्रातील करिअरविषयी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

GJC CAREER GUIDANCE CELL WITH TWJ INSTITUTE PROG PHOTO

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल आणि ट्रेड विथ जाझ प्रा. लि. (टी.डब्लू.जे.) या शेअर ट्रेडिंग तसेच इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिथयश कंपनीतर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला होता. शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात शेअर मार्केट व ट्रेडिंग तसेच इव्हेंट मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, एंटरटेनमेंट व मिडिया, ट्रॅव्हलिंग, आय.टी. अशा विविध क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या सेमिनारमध्ये १५० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.

महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी प्लेसमेंट सेलच्या कार्याचा आढावा घेतला. उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि इतर विभागांचे प्राध्यापक उपस्थित होते. टी.डब्लू.जे.च्यावतीने संचालक श्री. अमित बालम, विविध उपक्रमांचे प्रतिनिधी श्री. सुशांत विचारे, श्री. यश वळंजू,  श्री. सिद्धेश पाटील, श्री. प्रणव बोंडे, श्री. ओंकार घाडगे, श्रीम. कीर्ती जोशी, श्री. अमित जाधव, श्री. रोहित खंडागळे, श्री. आदर्श कोकणकर, श्री. सत्यशील युवराज उपस्थित होते. श्रीम. महेश्वरी पाटणे यांनी उपक्रमाबद्दलचे आपले विचार मांडले.

Comments are closed.