gogate-college-autonomous-logo

मुंबई विद्यापीठ क्रीडा मंडळ नियम पुस्तिका व शैक्षणिक वर्ष: २०२१-२२च्या खेळासंबंधित मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी वरीलप्रमाणे मार्गदर्शन कार्यशाळा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे संपन्न झाली. या कार्यशाळेला रत्नागिरी जिल्ह्यातील विविध वरिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा संचालक उपस्थित होते. विद्यापीठाच्या क्रीडा विभागाने खेळ व स्पर्धा यांची नियमावली, विभागांची बदललेली रचना व क्रीडा संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील तळागाळातील खेळाडूंपर्यंत हा संदेश पोहोचविण्यासाठी मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व संलग्नित महाविद्यालये व संस्थांचे क्रीडा संचालक, क्रीडाशिक्षक आणि क्रीडा विभागप्रमुख यांना मार्गदर्शन करण्यासाठी वरील कार्यशाळेचे आयोजन मुंबई विद्यापीठ, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या प्रारंभी प्रास्ताविक आणि स्वागत महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांनी केले.

मुंबई विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मोहन ना. आमृळे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन करताना असे सांगितले की, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम- २०१६ कलम ५८ नुसार क्रीडा संस्कृतीच्या प्रचलनासाठी आणि खेळांशी संबंधित उपक्रमांकडे लक्ष देण्यासाठी आणि मुंबई विद्यापीठ अंतर्गत सामाविष्ठ असलेल्या महाविद्यालयांची व्याप्ती लक्षात घेता खेळाडूंना विद्यापीठांच्या स्थानिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे, स्पर्धेचा आर्थिक भार व प्रवासाचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सर्व आंतरमहाविद्यालयीन वरील चार विभागांची निर्मिती करण्यात आली आहे असे सांगितले.

या विभागांमध्ये निर्माण झालेली व्यवस्था, क्रीडा स्पर्धांच्या प्रसारासाठी व खेळांच्या, विद्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्यांच्या विकासासाठी विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धांच्या बजेटमध्ये भरघोस वाढ करण्यात आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या खेळातील प्रगतीसाठी व क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी व मुंबई विद्यापीठ अंतर्गत तळागाळातील महाविद्यालयांपर्यंत क्रीडा स्पर्धांचा प्रसार करण्यासाठी सर्व विभागांच्या पाठीशी मुंबई विद्यापीठ आणि क्रीडा विभाग खंभीरपणे उभे राहण्याची मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे ग्वाही दिली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी याप्रसंगी विचार मांडताना म्हणाले की, विद्यापीठाच्या क्रीडाविषयक नवीन धोरणाला ग्रामीण भागात सर्वत्र पोचविण्यासाठी महाविद्यालय आणि र. ए. सोसायटी कटिबद्ध राहिल अशी ग्वाही दिली आणि कार्यशाळेला आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

वरील कार्यशाळेचे आयोजन व नियोजन यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा  श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीशजी शेवडे, र. ए. सोसायटीचे जिमखाना सदस्य डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही विभागांचे उपप्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, सेवक, जिमखाना विभागातील सर्व सहकारी यांनी दिलेल्या सहकार्यासाठी प्रा. अमोल सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.

Comments are closed.