gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘दिवाळी अंक-२०२१’चे प्रदर्शन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही ‘दिवाळी अंक-२०२१’च्या प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यावर्षी विविध विषयांना वाहिलेले अनेक नामवंत लेखकांचे प्रसिद्ध असे दिवाळी अंक सदर प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. दरवर्षी या प्रदर्शनाला विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.

या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना त्यांनी ‘दिवाळी अंक हे एक असे माध्यम आहे की त्यामध्ये साधारणतः वर्षातील विविध घटना आणि साहित्यातील विचार यांचा आढावा घेतलेला असतो. याअर्थाने सदर दिवाळी अंक हे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना अधिक उपयुक्त ठरतील’ असे विचार व्यक्त केले.

ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी प्रस्तावना करताना, ‘यावर्षीचे दिवाळी अंक हे वाचनीय असून काही अंक हे संग्राह्य आहेत; सर्वांनी या साहित्यरूपी फराळाचा आस्वाद घ्यावा’ असे उपस्थितांना आवाहन केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विशाखा सकपाळ, प्रा. अनिल उरुणकर, प्रा. माधव पालकर, प्रा. शिवराज गोपाळे, प्रा. वैभव कानिटकर, प्रा. शिल्पा तारगावकर, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

 

Comments are closed.