gogate-college-autonomous-logo

जगप्रसिद्ध सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्सेस विभागातील मार्च २०२१ मधील ०९ विद्यार्थ्यांच्या यशस्वी निविडीनंतर पुन्हा एकदा डिसेंबर २०२१ मध्ये मध्ये झालेल्या विवडप्रक्रीयेअंतर्गत मायक्रोबायोलॉजीच्या प्रसन्ना काळे, तेजस निंबरे तसेच बायोटेक्नॉलॉजीच्या बॉस्को बेथेलो, जयवंत सुर्वे आणि तुषार अंबुरे अशा ०५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांची यशस्वीरीत्या निवड झाली आहे.

कोकणातील दर्जेदार शिक्षणासाठी आणि उत्तमोत्तम विद्यार्थी तयार करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने नेहमीच आपले मोठे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी तसेच करियर घडविण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. यामध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे नेहमीच पाठबळ लाभले आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आणि कार्यवाह श्री. सतीश शेवडे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभल्याचे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत, सदस्य डॉ. उमेश संकपाळ, मायक्रोबायोलॉजी विभागाचे डॉ. नितीन पोतदार व बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या प्रा. रश्मी भावे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे नमूद त्यांनी नमूद केले. भविष्यात अशाचप्रकारचे सुयश महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राप्त करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Comments are closed.