gogate-college-autonomous-logo

मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘वेध-२०३५’ या ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षेचे आयोजन

मराठी विज्ञान परिषद, मध्यवर्ती विभाग, मुंबईमार्फत ‘वेध-२०३५’ ही ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षा आयोजित केली आहे. इ. ६वी ते इ. ९वीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या परीक्षेमध्ये लिखित मजकूर, व्हिडीओ व्याख्याने, प्रयोगांचे व्हिडिओ, विज्ञान कोडी, कूट प्रश्न, विज्ञान खेळ अशा प्रकारची अभ्यास सामग्री जाईल. यासाठीची प्रवेश प्रक्रिया दि. ७ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरु आहे.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि खगोल विज्ञान या विषयांवर आधारित अभ्यास सामग्री दर पंधरा दिवसांच्या अंतराने चार टप्प्यांत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. प्रत्येक टप्प्याच्या शेवटी दहा गुणांची सराव चाचणी घेतली जाईल. आठपेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञांनी याचे विकसन केले आहे. ही परीक्षा सहावी-सातवीसाठी प्रथमा आणि आठवी-नववीसाठी द्वितीया अशी मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून होईल.

प्रत्येक परीक्षेत गुणानुक्रमे पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यास दुर्बीण, द्विनेत्री सूक्ष्मदर्शी यासारखी पारितोषिके आहेत. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र मिळणार आहेत. दि. १९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. पारितोषिक वितरण हे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी केला जाईल.

विद्यार्थ्यांनी http://mavipa.org/vedh2035/ या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक डॉ. उमेश संकपाळ, रसायनशास्त्र विभाग यांच्याशी संपर्क साधावा. उपक्रमाची विस्तृत माहिती मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांचे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर उपक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.