gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १६ मार्च रोजी कै. वि. के. बावडेकर विज्ञान व्याख्यानमाला

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य डॉ. वि. के. बावडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विज्ञान व्याख्यानमालेचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते. शनिवार दि. १६ मार्च २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजता राधाबाई शेट्ये सभागृह येथे डॉ. एम. के. जनार्दनम, वनस्पतीशास्त्र विभाग, गोवा विद्यापीठ हे ‘वनस्पती, माणूस आणि पर्यावरण’ या विषयावर सदर व्याख्यानमालेचे ३३वे पुष्प गुंफणार आहेत.

रत्नागिरीतील नागरिकांनी या व्याख्यानमालेस आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.