gogate-college

मुंबई विद्यापीठ महिला तायक़्वादो स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. प्रियांका चव्हाणला सुवर्णपदक राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

जी. एन. खालसा महाविद्यालय, मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठ (महिला) तायक़्वादो स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. प्रियांका चव्हाण हिला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. दि. १४ मार्च पासून एम. डी. विद्यापीठ, रोहतक येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेकरिता तिची मुंबई विद्यापीठ (महिला) तायक़्वादो संघामध्ये निवड झाली आहे.

कु. प्रियांका हिच्या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, जिमखाना क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तिनही विभागांचे उपप्राचार्य, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे व जिमखाना विभागातील सर्व सहकारी, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियांका चव्हाण
Comments are closed.