gogate-college-autonomous-logo

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वाङ्मय मंडळ आणि संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘संस्कृत संभाषण वर्गाचे’ आयोजन करण्यात आले आहे. संस्कृत ही देववाणी म्हणून ओळखली जाते. सर्व भाषांची ती जननी आहे. तिचे उपयोजन करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी व ती रोजच्या बोलण्याचा भाग बनावी या हेतूने सदर वर्ग आयोजित करण्यात आला आहे. वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्या विशाखा सकपाळ, प्रा. वैभव कानिटकर, प्रा. मकरंद दामले आणि जान्हवी मुणगेकर उपस्थित होते. दि. २९ जुलै पासून सायंकाळी ५ ते ६ या वेळेत सात दिवस चालणाऱ्या या वर्गात एक विद्यार्थिनीच शिक्षकांचे काम पाहणार आहे.

कार्यक्रमाचे सुत्रासंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. विस्मया कुलकर्णी यांनी केले. उपप्राचार्या विशाखा सकपाळ यांनी सदर उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. या संभाषण वर्गाला विद्यार्थ्यांचा उत्तम सहभाग मिळाला आहे.

Comments are closed.