gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि रत्नागिरी कांदळवन कक्ष यांचा आरे परिसरात खारफुटीच्या लागवडीचा उपक्रम

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि रत्नागिरी कांदळवन कक्ष यांचा आरे परिसरात खारफुटीच्या लागवडीचा उपक्रम

२६ जुलै हा दिवस खारफुटीच्या वनांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तसेच समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक खारफुटी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे निसर्ग मंडळ, प्राणीशास्त्र विभाग आणि रत्नागिरी कांदळवन संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीच्या आरे या परिसरात खारफुटीच्या रोपांची लागवड करण्यात आली. ही रोपे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कांदळवन रोपवाटिकेमध्ये रुजविण्यात आली होती. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी कांदळवन कक्षाचे वनाअधिकारी श्री. राजेंद्र पाटील आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना खारफुटी दिनाचे महत्व पटवून दिले.

श्री. राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना असे म्हटले की कांदळवन ही वनस्पती पर्यावरण परिसंस्थेमध्ये फार महत्वाची आहे व आपल्या जीवन प्रक्रियेचा भाग म्हणून सदर वनस्पती कार्बनडाय ऑक्साईडचे जास्त प्रमाणात शोषण करून इतर वनस्पतींच्या तुलनेत जास्त प्राणवायू उत्सर्जीत करते.

यावेळी रत्नागिरी कांदळवन कक्षातर्फे रत्नागिरीच्या आरे परिसरात तयार करण्यात आलेली दुर्मिळ कांदळ वनस्पतींची रोपवाटिका विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली आणि कांदळवन संवर्धनासाठी प्रोत्साहित केले गेले. तसेच विद्यार्थ्यांना कांदळवन संवर्धनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कांदळ वनस्पतींच्या माहितीपुस्तीकेचेही कक्षातर्फे वितरण करण्यात आले.

या वृक्षारोपण प्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले. सदर कार्यक्रम गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

Comments are closed.