gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर कॉलेजमधील नौदल एन.सी.सी.छात्र कॅडेट कॅप्टन सौरभ लघाटे नवी दिल्ली येथील ‘प्रजासत्ताक दिन परेड’मध्ये सहभागी

गोगटे जोगळेकर कॉलेज मधील नौदल एन.सी.सी.विभागातील छात्र सिनियर कॅडेटकॅप्टन सौरभ लघाटे नवी दिल्ली येथे दि. २६ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील प्रजासत्ताक दिन कॅम्पमध्ये सहभागी झाला.महाविद्यालयात तृतीय वर्ष इंग्रजी विभागात अध्यन कार्य करणाऱ्या या छात्राने एन.सी.सी विभागातील आपली सर्व कर्तव्य पार पडत असताना स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध कॅम्प पूर्ण केले आहेत.

या छात्राने ओव्हरसीज डिप्लॉयमेंट हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॅम्प देखील पूर्ण केला आहे. आरवली या गावातीलया गुणवंत छात्राने नाशिक, पुणे, आणि कोल्हापूर येथील सर्व खडतर असे प्री-आरडी कॅम्प पूर्ण करून शिप मोडलिंग या इव्हेंट्सच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. या छात्राला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ०२ महाराष्ट्र नेव्हल एन.सी.सी.चे कमांडिंग ऑफिसर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले आहे.

Comments are closed.