gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम वाचन कट्टा’ उपक्रमाचा प्रारंभ

डॉ. कलाम वाचन कट्टा कै. बाबुराव जोशी ग्रंथालय

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून साकार झालेला आणि विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना जोडणारा दुवा म्हणजे ‘वाचन कट्टा’ होय. महाविद्यायातील विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यास, करिअर इ.विषयीच्या विविध्प्रकारच्या शंका याठिकाणी सोडविता येतील. विषय शिक्षक सबंधित विद्यार्थ्यांना याठिकाणी मार्गदर्शन करतील असा ‘वाचन कट्टा’च्या प्रयोजानामागील प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमासाठी ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत एक स्वतंत्र असा विभाग निर्माण करण्यात आला असून त्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. अलका कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले, डॉ. विवेक भिडे, विविध विभागांचे प्रमुख, ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर आणि ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे उपस्थित होते.

प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, ‘भारतरत्न डॉ. कलाम यांच्या ज्ञान प्राप्त करण्याची तळमळ, जिज्ञासा आणि त्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी या गुणांविषयी माहिती सांगून त्यांचे नाव या उपक्रमाला देण्यात आल्याचे सांगितले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही अशाप्रकारे ग्रंथालय या मध्यवर्ती ठिकाणी त्यांच्या विविध प्रकारच्या शंकांना सबंधित विषय शिक्षक मार्गदर्शन करतील; अशाप्रकारे हा वाचन कट्टा निश्चितच प्रेरणादायी ठरेल’ असा विश्वात याप्रसंगी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठी भाषा पंधरवडानिमित्त मराठी वाड्मय, भारतीय संविधानविषयक आणि भारतरत्न डॉ. कलामविषयक माहितीपर ग्रंथांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटनही मान. प्राचार्यांच्याहस्ते संपन्न झाले.

सदर कार्यक्रमांना सर्व ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कै. बाबुराव जोशी ग्रंथालय डॉ. कलाम वाचन कट्टा उद्घाटन

Comments are closed.