gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर आर्मी आणि नेव्हीतील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी लेफ्टनंट दिलीप सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली परेडचे शानदार संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यानंतर महाविद्यालयाच्या गणित आणि माहिती तंत्रज्ञान विभागांच्या आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या ‘मिळून साऱ्याजणी’ अशा विविध भित्तीपत्रकांचे अनावरण झाले. या संपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.