gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ७ फेब्रुवारी २०२० रोजी ‘पदवीदान समारंभ’

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या व मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी  प्रमाणपत्र वितरणाचा ‘पदवीदान समारंभ’ शुक्रवार दि. ०७ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ०४.०० वाजता महाविद्यालयाच्या कै. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मान. श्री. सुनीलजी चव्हाण आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन उपस्थितीत राहणार आहेत. सायंकाळी ०५.०० वाजता सर्व विद्यार्त्यांना राधाबाई शेट्ये सभागृहात पदवी प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे. सदर ‘पदवीदान समारंभाला’ संबंधित विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.