gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मतदानाची रंगीत तालीम

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मतदानाची रंगीत तालीम

जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदारांमध्ये ईव्हीम आणि व्हीव्हीपॅट मशिनसंबंधी जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिरूप मतदानाच्या माध्यमातून नवमतदारांनी मतदानाची रंगीत तालीम केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निलेश पाटील यांनी केले.

सध्या नवमतदारांची संख्या वाढत असून, त्यांच्यात मतदान प्रक्रियेविषयी जनजागृती व्हावी, त्यांच्या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग वाढावा, या हेतूने गोगटे जोगळेकर महाविद्यालयात रत्नागिरी तहसीलदार कार्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ईव्हीम आणि व्हीव्हीपॅट मशिनसंबंधी जनजागृती’ आणि ‘अभिरूप मतदान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी अभिरूप मतदान करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी नवमतदारांशी संवाद साधताना ‘भारतीय लोकशाही अधिकाधिक सुदृढ होण्यात मतदारांची भूमिका अत्यंत महत्वाच आहे. आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बाजावूया आणि लोकशाही बळकट करूया. प्रशासनामार्फत राबविण्यात येणारा अभिरूप मतदानाचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. नवमतदारांनी आपला पवित्र हक्क बजावून जास्तीत जास्त मतदान करावे जेणेकरून मतदानाचे प्रमाण वाढेल; असे आवाहन केले.

यानंतर तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नावमतदार विद्यार्थ्यांना ईव्हीम आणि व्हीव्हीपॅट मशिनसंबंधी प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्याकडून अभिरूप मतदान करवून घेतले. यावेळी महाविद्यालयातील मतदार साक्षरता क्लबचे मुख्य समन्वयक प्रा. तुळशीदास रोकडे, प्रा. बीना कळंबटे, प्रा. सचिन सनगरे,डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. सायली पिलणकर इ. उपस्थित होते.

या अभिरूप मतदान प्रक्रियेत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने आपला सहभाग नोंदवला.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मतदानाची रंगीत तालीम
Comments are closed.