gogate-college

डॉ. आर. एच. कांबळे यांना मानाचा कै. डॉ. वि. गो. खोबरेकर पुरस्कार जाहीर

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. आर. एच. कांबळे यांना २०१९ या वर्षीचा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय या शतक महोत्सवी संस्थेचा मानाचा ज्येष्ठ इतिहास संशोधक ‘कै. डॉ. वि. गो. खोबरेकर पुरस्कार’ त्यांच्या ‘ऐतिहासिक शोधनिबंध’ या पुस्तकाला नुकताच जाहीर झाला. या पुरस्काराचा वितरण समारंभ दि. १६ मार्च २०१९ रोजी या संस्थेच्या वार्षिकोत्सवात ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

जानेवारी महिन्यातच डॉ. कांबळे यांना महाराष्ट्र राज्य इतिहास महामंडळाचा ‘म. कृ. केरूळकर आदर्श महाविद्यालयीन इतिहास प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. २०१६ साली त्यांच्या ‘चिमाजी आप्पांची कामगिरी’ या ग्रंथास कोकण इतिहास परिषदेचा ‘उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार’ प्राप्त झाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५० व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरीतील सामाजिक कार्य’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. या तीनही पुस्तकांचे प्रकाशन पुण्याच्या डायमंड प्रकाशन या नामवंत संस्थेने केले आहे.

डॉ. कांबळे यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.