gogate-college-autonomous-logo

आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीपाला वर्षानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पोस्टर आणि पॉवरपॉइंट सादरीकरण स्पर्धा संपन्न

संयुक्तराष्ट्र संघाने २०२१ हे वर्ष आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीपाला वर्ष म्हणून घोषित केले आहे. यानिमित्ताने संपूर्ण जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे यानिमित्ताने पोस्टर आणि पॉवरपॉइंट सादरीकरण स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आल्या.

मानवी आहारातील फळे आणि भाज्या यांचे महत्व या विषयावरील पोस्टर आणि पॉवरपॉइंट सादरीकरण स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पोस्टर सादरीकरण स्पर्धेत साहिल आलीम, मानसी करंदीकर आणि तन्वी गोगटे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. साक्षी साळवी, उझ्मा हुश्ये आणि सिमरन आवटी यांनी पॉवरपॉइंट सादरीकरण स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. जी. एस. कुलकर्णी यांनी दिलेल्या देणगीतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाती प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागातील प्राध्यापकांच्या सहकार्याने सदर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.

Comments are closed.