gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कै. पी. एन. देशमुख स्मृती कार्यक्रम संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कै. पी. एन. देशमुख यांचा तृतीय स्मृती कार्यक्रम दि. १६ मार्च २०२१ रोजी संपन्न झाला. डॉ. स्मिता लेले, माजी संचालक, रासायनिक तंत्रज्ञान संस्था आणि फळप्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योजक श्री. निलेश लेले यांच्या ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आणि विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे याप्रसंगी उपस्थित होते. कै. पी. एन. देशमुख स्मृती कार्यक्रम डॉ. मंजुश्री देवधर यांनी दिलेल्या देणगीतून प्रतिवर्षी साजरा केला जातो.

कै. पी. एन. देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तासेच प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. कै. पी. एन. देशमुख यांच्या कन्या सौ. मंजुश्री देवधर यांनी आपल्या भाषणात देशमुख सरांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी फळप्रक्रिया व्यवसायाशी सबंधित व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल वनस्पतीशास्त्र विभागाचे अभिनंदन केले. तसेच आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीपाला वर्षानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करावे अशी सूचना केली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी वनस्पतीशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील व्यवसायाच्या संधींची ओळख होईल असा विश्वास व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीपाला वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. स्मिता लेले आणि श्री. निलेश लेले यांची व्याख्याने संपन्न झाली. डॉ. स्मिता लेले यांनी आपल्या व्याख्यानात कृषी, अन्न प्रक्रिया उद्योगातील सद्य स्थिती तसेच त्यातील आव्हाने आणि भविष्यातील संधी याविषयी विस्तृत वेवेचन केले. तर श्री. निलेश लेले यांनी कोविड पश्चात कालावधीतील अन्न प्रक्रिया क्षेत्रासंबंधीचा आढावा घेतला. अन्न व फळप्रक्रिया तासेच मूल्यवर्धित पदार्थनिर्मिती याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.

आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीपाला वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या पोस्टर आणि पॉवरपॉइंट सादरीकरण स्पर्धेचा निकाल यानंतर जाहीर करण्यात आला. प्रा. शरद आपटे यांनी प्रमुख वक्त्यांचा विस्तृत परिचय करून दिला. डॉ. सोनाली कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.

कै. पी. एन. देशमुख यांचा स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ऑनलाइन व्याख्यानाचा लाभ महाविद्यालयातील आजी, माजी प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक यांनी घेतला.

Comments are closed.