gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुयश

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायन शास्त्र विभागातील कु. नेहा भाटकर हिने प्रो. एम. एस. वाडिया या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत द्वितीय पारितोषिक प्राप्त केले आहे. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री विभागाद्वारे आयोजित अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या आणि पदव्युत्तर विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तिने रोख रु. ३००० चे पारितोषिक आणि प्रमाणपत्र पटकावले. कु. नेहा हिने ‘नॅनो मटेरियल अॅड देअर अॅप्लीकेशन्स’ या पेपरचे सादरीकरण केले.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे आणि पदव्युत्तर विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांनी कु. नेहा हिचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2020 (11)
  • 2019 (161)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)