gogate-college

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा दिन साजरा

मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला गेला.

‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयावरील भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. यामद्धे विविध पुस्तकांच्या परीक्षणांचाही समावेश होता. मराठी भाषेसंदर्भात मनात असलेले विचारही विद्यार्थ्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका प्रा. विशाखा सकपाळ, प्रा. सुशील वाघधरे, प्रा. प्रकाश दीक्षित, प्रा. स्वराली शिंदे तसेच शिक्षक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.
 
  • 2020 (10)
  • 2019 (161)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)