gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात समारंभ समितीप्रमुख प्रा. शिवाजी उकरंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक समाजशास्त्रज्ञ, वंचित-बहुजनांचे दु:ख, वेदना ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्रातून बहुआयामानेमांडणारे पत्रकार, अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक, जलनितीतज्ज्ञ, संविधानाचे निर्माते अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकूनआधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी केलेल्या कार्याची महती उपस्थितांसमोर मांडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी कुलकर्णी होते. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील द्रष्टे नेते होते. भारतातील वैविध्यपूर्ण समाजाचा अभ्यास करून शोषित-वंचितांचे नेते म्हणून ते पुढे आले. आपले संपूर्ण आयुष्य समाजातील दीन-दलितांच्या उद्धारासाठी खर्च करून राज्यघटनेच्या माध्यमातून समाजात समता, न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचे आचार-विचार, चारित्र्य आणि चरित्र संपूर्ण समाजाला प्रेरणादायी, बोध घेण्यासारखे असून, तसे आचरण करणे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाअभिवादन ठरेल, असे ते पुढे म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन हिंदी विभागाचे प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य प्रा. डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य आणि शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या अनुक्रमे डॉ. यास्मिन आवटे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य चिंतामणी दामले, पर्यावेक्षिका प्रा. अस्मिता कुलकर्णी, विविध विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed.