gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांना अभिवादन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांना अभिवादन

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते लोकमान्य टिळक यांना गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे त्यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रतिवर्षी दि. २३ जुलै रोजी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी महाविद्यालयाचे जवाहर क्रीडांगण ते टिळक जन्मस्थानापर्यंत अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात येते. यात्रेचे हे १४ वे वर्ष आहे. सदर यात्रा टिळक जन्मभूमी येथे आल्यानंतर संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी गीतेचा बारावा अध्याय ‘भक्तियोग’चे पठन केले. त्यानंतर श्री. प्रताप चव्हाण यांनी शब्दबद्ध केलेले आणि श्री. विजय रानडे यांनी संगीतबद्ध केलेले ‘रत्नभूमी ही पावन सुंदर’ हे गीत सदर केले. तसेच जीजीपीएसच्या विद्यार्थ्यांनी ‘देश मेरा देश मेरा भारती’ हे नितीन लिमये लिखित देश्भाक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर श्री. महेश सरदेसाई यांनी पारंपारिक वेशात लोकमान्यांची आरती केली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रशासकीय प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढयातील योगदान आणि कार्याचे स्मरण राहावे, म्हणून दरवर्षी या अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात येते. टिळकांनी विद्यार्थीदशेतच सार्वजनिक कार्यात आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या चतु:सूत्री आंदोलनाने देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाला वेगळे वळण दिले. त्यात महात्मा गांधीनी सत्याग्रह या पाचव्या सूत्राची भर घातली. लोकमान्यांचे विचार आजही आपणास मार्गदर्शनिय असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून स्फूर्ती घेतली पाहिजे.’

या अभिवादन यात्रेत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि महाविद्यालयातील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीश शेवडे, उद्योजक श्री. श्रीकांत भिडे, तीनही विभागांचे उपप्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या, कार्यक्रम समितीप्रमुख डॉ. निधी पटवर्धन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या यात्रेत सहभाग घेतला. टिळक महाराजांच्या स्तोत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांना अभिवादन
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांना अभिवादन
h
Comments are closed.