gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण मसुदा – २०१९ या विषयावरील चर्चासत्र संपन्न

मुंबई विद्यापीठ आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय शिक्षण मसुदा -२०१९ आणि महाविद्यालय विकास समिती’ या विषयवर एकदिवसीय चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी नॅक मूल्यांकन, त्याची कार्यपद्धती आणि फलित याविषयी सविस्तर माहिती दिली. चर्चासत्रात डॉ. शेखर चंद्राते, डॉ. अनिल कुलकर्णी, प्रा. सुभाष आठवले यांनी साधनव्यक्ती म्हणून काम पहिले.

पहिल्या सत्रात डॉ. चंद्राते यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पार्श्वभूमी, त्यातील नवीन बदल, पूर्वीची शिक्षणविषयक ध्येयधोरणे या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. कुलकर्णी यांनी राष्ट्रीय शिक्षण मसुद्यातील बदल, शिक्षण क्षेत्रात त्यामुळे होणारे अमुलाग्र बदल, सध्याची शिक्षणपद्धती अशा विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. त्यानंतर या चर्चासत्रास उपस्थितांनी प्रश्नोत्तरांच्या मध्यमातून आपल्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. सागर संकपाळ यांनी केले. या चार्चासात्राकरिता मुंबई विद्यापीठाशी सालाग्नित असलेल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदवला. या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन तर उपप्राचार्य विवेक भिडे आणि श्री. प्रसाद गवाणकर यांचे उत्तम सहकार्य लाभले.

Comments are closed.