gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ‘जलजीवन मिशन प्रकल्प’ ग्रामीण जलपुरवठा व्यवस्थेचे अध्ययन

उन्नत महाराष्ट्र अभियान कक्ष, आय.आय.टी. मुंबई आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने जलजीवन मिशन प्रकल्प अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील २० गावांच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे अध्ययन केले गेले. रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील समाजशास्त्र व अर्थशास्त्र विभागातील ६ विद्यार्थांची निवड आय.आय.टी. मुंबई यांचेकडून करण्यात आली. लांजा तालुक्यातील पालु, कोंडगे, संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे व रत्नागिरी तालुक्यातील सडामिऱ्या या गावांतील पाणी पुरवठा व्यवस्थेचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला. समाजशास्त्र विभागातील स्वरूप जिरोळे, आर्या खातू, वैष्णवी जाधव, रोहित ठुकरूळ, अन्वी साळवी व अर्थशास्त्र विभागातील ओजस लाड या विद्यार्थ्यांनी प्रकल्पात सहभाग घेतला.

यामध्ये ग्रामीण भागातील जलस्त्रोत, सद्यकालीन पाणी पुरवठा साधने, जलटंचाईची स्थिती, स्थानिकांची मते यासर्वांचे शास्त्रीय व सर्वेक्षणात्मक अध्ययन करण्यात आले. याकरिता आयआयटी मुंबईचे प्रा. मिलिंद सोहोनी, डॉ. गोपाळ चव्हाण तसेच स्थानिक प्रतिनिधी व समन्वयक अक्षय चव्हाण, हर्षद तुळपुळे, आकाश गरुड, तनया पंगेरकर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. महाविद्यालयीन स्तरावर डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सोनाली कदम, डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. तुळशीदास रोकडे, डॉ. रामा सरतापे, यांचे सहकार्य लाभले. माहिती विश्लेषण व अहवाल लेखन यासाठी डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. विनायक गावडे, प्रा. सचिन सनगरे यांनी मार्गदर्शन केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Palu Fanasavane Lanja
Comments are closed.