gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे कै. बाबुराव जोशी ग्रंथालय ठरले ‘आंतराष्ट्रीय गुणवत्तेच्या क्षेत्रातील मानबिंदू’

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे कै. बाबुराव जोशी ग्रंथालय ठरले ‘आंतराष्ट्रीय गुणवत्तेच्या क्षेत्रातील मानबिंदू’

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालय हे रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच कोकण परिक्षेत्रातील एक अग्रगण्य आणि समृद्ध असे ग्रंथालय आहे. ग्रंथालयाची स्थापना गो. जो. महाविद्यालायाबरोबरच म्हणजे १९४५ यावर्षी झाली. ग्रंथालयात ग्रंथ देव-घेव कक्ष, अभ्यासिका कक्ष, संदर्भ ग्रंथ दालन, दुर्मिळ ग्रंथ दालन, नियतकालिक कक्ष, स्पर्धा परीक्षा आणि नेट-सेट परीक्षा कक्ष, पदव्युत्तर विभाग स्वतंत्र कक्ष, मोफत इंटरनेट सुविधा तसेच पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त अशी आणि आपल्या आवडीचा ग्रंथ कापाटाजवळ जाऊन निवडण्यासाठी असलेली ‘मुक्तद्वार पद्धती’ अशा प्रमुख सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

ग्रंथालयात विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रमाणित केलेली ‘सोल’ही संगणक प्रणाली कार्यरत असून संगणकावर वाचन साहित्य पाहण्यासाठी ‘ओपॅक’ ही सुविधा उपलब्ध आहे. ग्रंथालय पूर्णत: संगणकीकृत असून बारकोडिंग प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या बारकोडद्वारेच सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना पुस्तक देव-घेव केली जाते. ‘वेब ओपॅक’ ची उपलब्धी हे आणखी एक या ग्रंथालयाचे वैशिष्टय आहे. सद्य:स्थितीत ग्रंथालयाची एकूण ग्रंथ संख्या १,१२,१४६ (यामध्ये ६७,०१६ संदर्भ ग्रंथ आणि ४५,१३० क्रमिक पुस्तके) असून २१ दैनिके तसेच १४२ नियतकालिके नियमित येत असतात. तर सुमारे ७,०००+९,८४,८०९ ई-नियतकालिके आणि १,४०,०००+१६१३ पेक्षा अधिक ई-बुक्स उपलब्ध आहेत. दृक्श्राव्य माध्यमे ८१० असून (यामध्ये विविध विषयांच्या टॉकिंग बुक्सचादेखील समावेश आहे), प्रबंध आणि शोधनिबंबंधांची संख्या ६२ आहे; तसेच ग्रंथालयाकडे २८१ दुर्मिळ पुस्तके आणि ७८ हस्तलिखितांचा खजिना उपलब्ध आहे.

याखेरीज ‘सहकार’ या महाविद्यालयाच्या वर्षीकांकाचे डिजिटाइज फॉर्ममध्ये रूपांतरण करण्यात आले आहे. तसेच विविध दैनिकांत प्रसिद्ध होणाऱ्या आणि महाविद्यालयाशी संबंधित अशा बातम्यांचे संकलन आणि डिजिटाइज फॉर्ममध्ये रूपांतरण करण्यात आले आहे. ग्रंथालयाची प्रशस्त, हवेशीर आणि स्वतंत्र अशी ‘अभ्यासिका’ ही विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनास प्रेरित करणारी सुंदर अशी जागा आहे. तसेच पदवी आणि पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: मोफत असा ‘इंटरनेट कक्ष’ कार्यान्वित आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी स्वतंत्र अभ्यासिका कक्ष आहे.

ग्रंथालयात नियमितपणे आणि विशेष दिवसांचे औचित्य साधून ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह ‘ग्रंथप्रदर्शन’द्वारे वाचकांना खुला करून दिला जातो. सहकार भित्तीपत्रक प्रकाशनप्रसंगी भित्तीपत्रकाच्या विषयानुसार ग्रंथ प्रदर्शने नियमितपणे आयोजित केली जातात. ग्रंथालयात उपलब्ध असलेली ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांना कळावी या प्रमुख उद्देशाने सदर प्रदर्शनांचे आयोजन केले जाते.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पूरक आणि सकस वाचनाकरिता प्रवृत्त करणारे आणि विद्यार्थीभिमुख असे ग्रंथालयाचे अनेकविध उपक्रम आहेत. यामद्धे नवीन आकर्षणे असलेला कक्ष, नव्याने दाखल झालेल्या ग्रंथांची ‘ग्रंथयादी’ नवीन आकर्षणे येथे प्रदर्शित करणे, विद्यापीठ परीक्षांचे प्रश्नसंच तयार करणे, महाविद्यालयाशी सलग्न अशा प्रसारमाध्यमातील बातम्या संकलन करणे, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील १७ विभागांची ‘विभागीय ग्रंथालये’ असून या विभागांना सुमारे १,८२५ ग्रंथ देण्यात आले आहेत, दिवाळी अंक प्रदर्शन अशाप्रकारच्या सेवा-सुविधांचा यामद्धे समावेश आहे.

याखेरीज मागासवर्गीय विद्यार्थी विद्यापीठ पुस्तक पेढी योजना, हुशार आणि गरजू विद्यार्थी पुस्तक पेढी योजना, कमवा शिका योजना, बहिस्थ विद्यार्थी ग्रंथालय सुविधा, विद्यार्थी ‘वाचक गट’ उपक्रम यातून करण्यात येणारी आदर्श विद्यार्थी वाचक आणि आदर्श शिक्षक वाचक पुरस्काराची निवड, रात्र पुस्तक देव-घेव योजना, रात्र अभ्यासिका, २०% सवलत पुस्तक पेढी योजना, कमवा व शिका योजना, बहिस्थ विद्यार्थी ग्रंथालय सुविधा, रात्र पुस्तक देव-घेव योजना यासारखे अनेक विद्यार्थीप्रिय असलेले ग्रंथालयीन उपक्रम प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतात. आगामी काळात कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालयाला आर.एफ.आय.डी. या अत्याधुनिक ग्रंथालय स्वयंचलित प्रणालीची जोड देण्याचा मानस आहे.

ग्रंथालयात ग्रंथालय कर्मचाऱ्यांकरिता आधुनिक ग्रंथालय शास्त्रातील होणाऱ्या बदलांविषयी माहिती होण्यासाठी नियमितपणे ‘कर्मचारी प्रशिक्षण’ आयोजित करण्यात येते. या प्रशिक्षण कार्यशाळेत मान्यवर तज्ञ मार्गदर्शन करतात. ग्रंथालयाने ‘ओपन सोर्स सॉफ्टवेअर’ या राज्यस्तरीय कार्यशाळेचे २०१८ मध्ये यशस्वी आयोजन केले असून या कार्यशाळेत राज्यातील महाविद्यालयीन ग्रंथपाल आणि कर्मचारी, सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपाल आणि कर्मचारी तसेच ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी सहभागी झाले. यापूर्वीही महाविद्यालयीन ग्रंथालयाने २०१० या वर्षी पुणे येथील ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थे’च्या सहयोगाने ‘हस्तलिखित कार्यशाळे’चे यशस्वीरित्या आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘नॅक’ मानांकन प्रक्रियेत कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाने उत्तम कामगिरी केली आहे.

अशा या कोकण विभागातील अनेक नाविन्यपूर्ण सेवा- सुविधांनी परिपूर्ण अशा म्हणजे कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाने ‘आयएसओ ९००१:२०१५’ हे आंतराष्ट्रीय दर्जाचे आणि व्यवस्थापनातील विशेष गुणवत्ता मानांकन प्राप्त केल्याबद्दल डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल, गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे झालेल्या ‘प्रमाणपत्र वितरण सोहोळया’स उपस्थित राहून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य, प्राध्यापक यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे कै. बाबुराव जोशी ग्रंथालय ठरले ‘आंतराष्ट्रीय गुणवत्तेच्या क्षेत्रातील मानबिंदू’
Comments are closed.