gogate-college

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाचे कर्मचारी अनिल सुवरे यांचे निधन

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाचे कर्मचारी अनिल सुवरे यांचे निधन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयातील कर्मचारी अनिल सुवरे यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. एक मनमिळाऊ कर्मचारी आणि हरहुन्नरी कलाकार अशी त्यांची ओळख होती. ग्रंथालय विभागात २५ वर्ष इतकी दीर्घकाळ सेवा करत असताना त्यांना नेमून दिलेली विविध कामे ज्यामध्ये विद्यापीठ प्रश्नपत्रिकांचे संच तयार करणे, महाविद्यालयाच्या बातम्यांवर आधारित कात्रणांचा संग्रह करणे, जुने अंक डीजिटाइज करणे, पुस्तक प्रदर्शनाची तयारी करणे इ. कामे कौशल्यपूर्ण रितीने कशी पूर्ण होतील यावर त्यांनी कायम भर दिला.

रंगभूषा, वेशभूषा, गणपती, देवीची मूर्ती तयार करणे या कामांमध्ये त्यांचा हातखंडा होता. महाविद्यालयाच्या कला महोत्सवात रंगभूषाकार म्हणून त्यांचा सातत्याने सहभाग असे. नाटकातील रंगभूषा आणि मूर्तीकला हा त्यांचा विशेष छंद होता. त्यांच्या अंत्ययात्रेत महाविद्यालयाचे प्राचार्य, ग्रंथपाल आणि सर्व कर्मचारी सहभागी होते.

Comments are closed.