gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘जस्ट डायल लि.’ करिता मुलाखती

महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल या विभागामार्फत भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत अशा जस्ट डायल लि. या कंपनीकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे रविवार दि. २३ जून २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजन करण्यात आले आहे. कंपनीमध्ये सेल्स अँड मार्केटींग अंतर्गत कोल्ड कॉलिंग, बिझनेस टू बिझनेस तसेच फिल्ड सेल्स या विविध प्रकारच्या जॉब प्रोफाईलकरिता या मुलाखती होणार आहेत.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच कोणत्याही शाखेत द्वितीय व तृतीय वर्षात शिकणारे विद्यार्थी या मुलाखतीकरिता उपस्थित राहू शकतील. त्याचप्रमाणे ही संधी इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मुलाखती महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत कै. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे होतील. अधिक माहितीसाठी प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत (मोबा. 9421142529) यांच्याशी संपर्क साधावा.

इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली मूळ कागदपत्रे आणि बायोडेटासहित उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.