gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे मुंबई विद्यापीठ परीक्षेत उज्ज्वल यश

एप्रिल २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष परीक्षेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. विभागाचा निकाल ९३.३३% लागला असून ८०.८८% गुण प्राप्त करून कु. सायली शेटे विभागात प्रथम; कु. सुप्रिया घुले ७९.८७% गुण प्राप्त करून द्वितीय तर प्रकाश चव्हाण ७९.५०% गुण मिळवून विभागात तृतीय आला आहे. विभागाच्या उज्ज्वल यशामध्ये विभागप्रमुख प्रा. रश्मी भावे आणि विभागातील सर्व प्राध्यापकांचे योगदान लाभले.

र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, शास्त्र शाखेचे उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक यांचे हार्दिक अभिनंदन करून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.