gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदत

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदत

र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वतीने चिपळुण तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. चिपळूणमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले असून, अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अनेक संस्था-संघटना मदतकार्य करण्यासाठी  पुढे आल्या आहेत. गोगटे जोगळेकर महाविद्यालय नेहमीच समाजपयोगी उपक्रमात सहभागी होऊन समाजाप्रती असलेले आपले ऋण व्यक्त करत असते.

सामाजिक बांधिलकीच्या नात्याने महाविद्यालयाच्या वतीने प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुलदत्त कुलकर्णी आणि  02 महाराष्ट्र नौदल एन.सी.सी.चे कमांडीग ऑफिसर कमांडर एम.एम.सईद यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात, घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करून त्यांचे वाटप करण्यात आले.

महाविद्यालयात कार्यरत असलेला राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एन.सी.सी. विभाग आणि आपत्ती निवारण कक्ष यांच्या वतीने महाविद्यालयातर्फे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू देण्याचे आवाहन केल्यावर शहरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुने कपडे, चादर, चटई, खाद्यपदार्थ आणि अन्य अत्यावश्यक वस्तू  महाविद्यालयात जमा केल्या. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन वस्तू संकलित केल्या. नंतर या वस्तूंचे एन.सी.सी.छात्रांनी चिपळूण परिसरातील कळबंस्ते, पेठमाप, टेंबेवाडी येथील पुरग्रस्त कुटुंबीयाना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

याकामी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रम अधिकारी डॉ. सोनाली कदम, एन.सी.सी.चे लेफ्टनंट अरुण यादव, लेप्टनंट डॉ. स्वामीनाथन भट्टर, लेफ्ट. दिलिप सरदेसाई, कॅप्टन सीमा कदम तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे काही माजी विद्यार्थी चिपळूणमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसमित्र म्हणून काम करून प्रशासनाला सहकार्य करीत आहेत.

 

Comments are closed.