gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात उर्दू राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील उर्दू विभाग आणि राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहीर शेवी : एकह्श्तपहेलू फनकार’ (Sahir Shiwee: A Multidimensional Writer) या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील उर्दू विभागउर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कायम प्रयत्नशील असतो. उर्दूच्या विकासासाठी विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. या आधीही विभागाच्या वतीने विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे.

उर्दू विभाग आणि राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० मार्च २०२२ रोजी सकाळी १०. ३० वाजता ‘साहीर शेवी : एकह्श्तपहेलू फनकार’ (Sahir Shiwee : A Multidimensional Writer) या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन र. ए. सोसायटीचे सचिव श्री. सतीश शेवडे यांच्या हस्ते होणार असून या उद्घाटन सोहळ्याला बीजभाषक म्हणून शारदा महाविद्यालय, परभणी येथील उर्दू विभागाचे प्रमुख डॉ. नूर-उल-अमीन, प्रमुख अतिथी डॉ. अब्दुल्ला इम्तियाझ अहमद (विभागप्रमुख, उर्दू विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई), र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्यानंतर चर्चासत्रामध्येजहीर दानिश उमरी, (हैदराबाद) श्री. अब्दुल रऊफ खतिब (खेड) डॉ. गझन्फर इक्बाल (गुलबर्गा), डॉ. इर्शाद अहमद खान (नांदेड) डॉ. ताबिश खान (अरेबिक विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई), डॉ. असरार उल्लाह अन्सारी (बुऱ्हानपूर), श्रीमती सय्यदा तबस्सुम नाडकर (मुंबई), श्री. कमाल मांडलेकर (मुंबई), डॉ. अबरार अहमद (पुणे), डॉ. शेख अहरार अहमद (मुंबई), डॉ. जावेद राणा (जबलपूर), डॉ. सय्यद ताजुल हुदा खतिब (बेलगावी), श्री. निजामुद्दीन साद (महाड), श्री. सईद कवल (मुंबई), श्री. मन्जर खय्यामी (श्रीवर्धन) आदि संशोधक उपस्थित राहणार असून आपल्या शोधनिबंधाचे वाचन करणार आहेत.

या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाकरिता उर्दू विभागप्रमुख डॉ. मोहम्मद दानिश गनी प्रयत्नशील असून महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ यांच्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे.

Comments are closed.