gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कॉमर्स विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची गोवा येथील सारस्वत महाविद्यालयाला भेट

sarswat-college-2

रत्नागिरीतील प्रथितयश असे गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि म्हापसा, गोवा येथील सारस्वत महाविद्यालयांमध्ये सामंजस्य करार आहे. याअंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून दि. २४ मार्च २०२२ रोजी महाविद्यालयातील डॉ. रुपेश सावंत, प्रा. स्वरूप घैसास आणि प्रा. रसिका नाचणकर या प्रध्यापाकांबरोबरच बी.कॉम. व एम.कॉम.च्या २५ विद्यार्थ्यांनी सारस्वत महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी सामंजस्य कराराचे आदानप्रदान, मागील आढावा व परिसर भेट इ. गोष्टी केल्या गेल्या. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे डॉ. रुपेश सावंत यांनी साधन व्यक्ती म्हणून सारस्वत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

तसेच विद्यार्थ्यांपैकी बुशरा खान व श्रुती बापट यांनी आपल्या महाविद्यालयाची माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली. सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

sarswat-college-2 sarswat-college-1

Comments are closed.