gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शिक्षकांसाठी Developing MOOCs: Tools and Techniques या विषयावर कार्यशाळा संपन्न

gjc-teacher-training-programme

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गुणवत्ता आणि प्रशिक्षण समिती’ यांच्यातर्फे शिक्षकांकरिता दि. १६ मार्च २०२२ रोजी ‘Developing MOOCs: Tools and Techniques’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक आणि कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि प्रमुख व्याख्यात्या डॉ. मधुरा मुकादम उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत समितीचे समन्वयक डॉ. महेश बेळेकर यांनी केले. त्यानंतर प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सहभागींना मार्गदर्शन केले. ‘शिक्षकाने नेहमीच अध्ययावत असलं पाहिजे आणि बदलत्या जगात नवनवीन संकल्पना शिकून त्या आपल्या अध्यापनामध्ये अंमलात आणल्या पाहिजेत’ अशी अशा प्राचार्यांनी व्यक्त केली.

सदर कार्यशाळेकरिता प्रशिक्षक म्हणून लाभलेल्या डॉ. मधुरा मुकादम या प्राणीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आहेत. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विषयाची मांडणी करून MOOCs म्हणजे काय?, काळाची गरज म्हणून आपण त्याकडे कसं पाहावे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच एखाद्या MOOCs प्लॅटफॉर्मवर कोर्स कसा तयार करावा याविषयी सविस्तर अशी माहिती दिली.

सदर कार्यशाळेकरिता ५२ प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदवला. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही कार्यशाळा उत्तमरीत्या संपन्न झाली.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सीमा कदम यांनी केले.

Comments are closed.