gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सहकार अंकास राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त

विद्यार्थांच्या नवनिर्मितीस चालना देणाऱ्या व महाविद्यालयाचा शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षकांच्या उत्तुंग कामगिरी यांचा लेखाजोखा स्पष्टपणे प्रतिबिंबित करणाऱ्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सहकार या वार्षिक अंकास महाराष्ट्रभर नामांकित असणाऱ्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांचे ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा २०२०-२१’ चे पारितोषिक प्राप्त झाले आहे. रोख रक्कम, सन्मान चिन्ह, मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व नव महाराष्ट्र युवा अभियानाच्या विशेष कार्यक्रमात हे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे.

यामुळे सहकार वार्षिक अंकास विविध पारितोषिके प्राप्त करण्याची यशस्वी परंपरा विद्यमानवर्षीही कायम राखण्यात सहकार संपादकीय मंडळास यश प्राप्त झाले आहे; त्यामुळे विविध क्षेत्रातून सहकार संपादक मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सहकार अंकामध्ये विद्यार्थांचे मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, उर्दू भाषेतील विविध लेखन शैलीतील साहित्य, रेखाचित्रे, सुलेखन, कविता, अनुभवलेखन, आदींचा समावेश असतो. विद्यार्थांच्या लेखनास अधिकाधिक वाव देण्याचा प्रयत्न या वार्षिक अंकाच्या माध्यमातून केला जातो. विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची छायाचित्रे, शैक्षणिक, सहशैक्षणिक व विशेष कार्यक्रमांचे अहवाल, विशेष नैपुण्य प्राप्त प्राध्यापक व विद्यार्थी यांचे योगदानाचा लेखी तसेच छायाचित्रा सहित दिलेली माहिती हीच सहकारच्या जमेची बाजू मानली जाते.

राष्ट्रीय मूल्यांकन आणि पुनर्मुल्यांकन कार्यासाठी सहकार हा महत्वाचा दस्तऐवज मनाला गेल्याने दर्जेदार सहकार अंक निर्मितीकडे सहकार संपादक मंडळाचा कायम कल असतो. ‘कोरोना आपत्तीवरील मात आणि मानवी जीवनाची दुर्दम्य इच्छाशक्ती’ या मुख्य विषयाला आधारून विद्यार्थांनी ८१ लेख व कवितांचे लेखन केले आहे. ५१ कार्य अहवाल, ४ विशेष अहवाल, ५५ विशेष छायाचित्रे यांनी सदर अंक सजलेला आहे.

आपत्तीवरील मात आणि मानवी जीवनाची दुर्दम्य इच्छाशक्ती याच विषयाची प्रमुख संकल्पना समोर ठेऊन मुखपृष्ठाचे सादरीकरण केले गेले आहे. कोरोना अपत्तीकाळकाळ लक्षात घेऊन सहकार मुद्रित आणि ई-स्वरुपात निर्माण केला गेला. ई-स्वरूपातील सहकार अंकाने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत विद्यार्थांना ई-सहकाराच्या माध्यमातून आधुनिक दालन उपलब्ध करून दिले आहे. सातत्याने गौरवपूर्ण वाटचाल व नवनवीन कल्पना मूर्त स्वरुपात आणण्याचे महाविद्यालयाचे कार्य अविरत सुरु आहे; त्याचे दस्त ऐवजीकरण सहकार वार्षिक अंक रूपाने होत असते.

यापारितोषिका संदर्भात आपली प्रतिक्रीया देताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले की, ‘हे पारितोषिक म्हणजे आपल्या कार्याची सामाजिक पाळीवर घेतलेली योग्य दखल आहे. या पुरस्काराने महाविद्यालयास नवीन प्रेरणा आणि बळ मिळाले आणि हे बळ महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल.’

र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, तीनही शाखांचे उपप्राचार्य, सहकार संपादकीय मंडळ व विविध लेखानाविष्कार करणारे विद्यार्थी नवलेखक यांचे या यशातील योगादानाबद्दल विशेष अभिनंदन केले आहे.

Comments are closed.